मराठी लिहा याबद्दल

केवळ आणि केवळ मराठी भाषेच्या प्रेमापोटी हि वेबसाईट केली आहे. मराठी लिहा ही वेबसाईट आपल्या सर्वांची आहे. कुणा एकाची नाही. येथे सर्व जण आपल्या मनात जे काही आहे ते सारे लिहू शकतात.

मराठी भाषक एकत्र यावेत, मराठी भाषा वाढावी हा हेतू. हे सर्व असतांना आपण इतर भाषांचा दुस्वास मात्र करणार नाही.

मराठी भाषा अतिशय तरल तसेच सर्वसमावेशक आहे. मराठी भाषेने अनेक परभाषेतील शब्द आपलेसे केले आहेत.

याच कारणामुळे मराठीलिहा.कॉम वर प्रत्येक शब्द मराठीच असला पाहिजे, परभाषेतील शब्द आला तर शिक्षा असे नाही.

देअरफोर, जास्तीत जास्त वेळा मराठी भाषेत लिहीण्याचा प्रयत्न करावा. अगदीच एखाद्या परभाषेतील शब्दाला मराठी प्रतिशब्द आठवत नसेल किंवा मुळात मराठीत शब्दच नसेल तर सरळ त्या त्या भाषेतला शब्द वापरावा.

आपण लिहीत असलेला लेख हा जास्तीत जास्त मराठीत हवा, केवळ हाच आग्रह आहे.

तसेच बोली भाषेतील शब्द वापरा, प्रमाण मराठी बोली वापरली नाही तरी चालेल!

व्याकरणाचाही प्रश्न नाही. वेलांटी ऊकार उलट पालट झाले तरी चालेल. अगदी "गांगल मराठी" वापराली तरी कुणी हरकत घेणार नाही.

हां, पण मराठीचा मुद्दा मात्र सोडू नका.

मनात येईल ते लिहा. मनातले विचार काळे पांढरे होऊ द्या. संगणकावर लिहा, मोबाईलवर लिहा.

आता पुर्वीसारखा फॉन्टचीपण काही अडचण नाही. लिहीण्यास काही अडचण असेल तर गुगल इनपूट साधने आहेत - पण ते क्रोम ब्राऊजरमध्येच चालते, इतर अनेक युटीलीटी आहेत.

अगदीच सुरूवात करायची असेल तर आम्हाला Info(at)MarathiLiha.com वर ईमेल करा. मराठी भाषेत तुम्ही लिहायला सुरूवात करत आहात तर आम्हाला आपणास मदत करायला आनंदच होईल.