Fastag आहे चांगलेच पण त्यात बर्याच त्रूटी आहेत.
जसे की:-
१. आधी सगळे हेल्पलाईन नंबर पावतीच्या पाठीमागे मिळायचे.
आता नाही.
ही सर्वात मोठी उणीव आहे.
२. पैसे जास्त कट झाले तर परत मिळवणे हे फक्त टेक्नॉसॅव्हींनाच जमेल.
३. हेल्प सपोर्ट खूपच खराब आहे. अगदी बॅंकेचे एम्प्लॉयीदेखील संपर्क करू शकत नाही कारण ते काम आऊटसोर्स केले आहे.
४. कोणाचीही वेबसाईट युजर फ्रेंडली नाही.
फक्त युजर इंटरफेस रंगीत संगीत केला म्हणजे वेबसाईट चांगली आहे असे नाही.
५. फास्ट टॅगचे स्टिकर फाटले तर डुप्लीकेट मिळवायच्या एवजी नवे टॅग घेतलेले परवडते.
६. टॅग ब्लॅकलिस्ट झाले तर नक्की कसे व्हाईटलिस्ट करायचे याची कुणालाच माहिती नाही.