"ज्याचा दर्या, त्याचे वैभव; ज्याचे आरमार, त्याचा समुद्र"
- छत्रपती शिवाजी महाराज
मराठा आरमार दिवस - २४ ऑक्टोबर (१६५७) - आम्हास अभिमान आहे!!

टीआरपी म्हणजे नेमके काय ?

अर्थ, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, वाहन दुरूस्ती, देखभाल, नवे शोध, संगणक, प्रोग्रामिंग प्रणाली इत्यादी.
Post Reply
kotjim
Posts: 21
Joined: Sun Oct 04, 2020 12:03 pm

टीआरपी म्हणजे नेमके काय ?

Post by kotjim »

टीआरपी म्हणजे नेमके काय ?

टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट . हे एक प्रकारचे यंत्र ( मशीन ) असते . जे काही घरांमध्ये लावले जाते . ज्यातून लोक कोणत्या प्रकारचे कार्यक्रम पाहतात . कोणते चॅनल किती वेळ पाहतात . याची माहिती मिळते . एखाद्या कार्यक्रमाला मिळणारा टीआरपी अधिक आहे . याचा अर्थ तो कार्यक्रम लोकप्रिय आहे . जादा टीआरपीचे आकडे पाहून जाहिरातदार संबधित वाहिनी अथवा संबंधित वाहिनीवरील कोणत्या कार्यक्रमाला किती जाहीरात द्यायची हे ठरवत असतो . तसेच , कोणत्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांना पाहायला आवडतात याबाबतही माहिती मिळते.अगदीच साध्या शब्दांमध्ये सांगायचे तर कोणत्या स्तरातील लोक कोणत्या प्रकारच्याहिन्या पाहतात . लोकांची कार्यक्रमांबाबतची अभिरुची काय आहे . याची माहिती मिळते . ज्यामुळे वाहिन्यांना आपले कार्यक्रम , कार्यक्रमाचा दर्जा , कार्यक्रमाची दिशा पाहायला मोठी मदत मिळते . एक बराच मोठा डेटा तयार होतो . टीआरपीचे आकडे म्हणजेच संपूर्ण प्रेक्षकांचा एकूण आकडा असे म्हणता येणार नाही . तसे म्हटले तरी ते पूर्ण सत्य असणार नाही . कारण टीआरपी मशिन अनेक परिसरांमध्ये काही घरांमध्येच लावले जाते . ज्या घरांमध्ये टिव्ही पाहिला जातो . जसे की असे सांगितले जाते की मुंबई शहरात साधारण 2000 टीआरपी मशीन आहेत . त्यामुळे टीआरपी असलेल्या घरांमध्ये जी चॅनल बहुतांश पाहिली जातात तीच चॅनल ( वाहिनी ) अथवा कार्यक्रम अधिक लोकप्रिय किंवा त्यालाच जास्त टीआरपी असे मानले जाते . त्यामुळे टिव्ही प्रेक्षकांचा ठोस आकडा पुढे येत नसला तरी ठोकळेबाज काही माहिती नक्कीच हाती लागते .

टीआरपीचा फायदा काय ... ?

टीआरपीचे आकडे पाहून वाहिन्या आपले कार्यक्रम , कार्यकमाचा दर्जा आणि दिशा ठरवतात . कोणत्या प्रकारचे कार्यक्रम , विषय लोकांना पाहायला आवडतात हे टीआरपीवरुन ठरते . इतकेच नव्हे तरी अलिकडे काही वृत्तवाहिन्यांनीही आपले कार्यक्रम टीआरपीचे आकडे पाहून बदलल्याचे सांगितले जाते . जाहीरातदाराचे बारीक लक्ष , जाहिरातींशिवाय वाहिनी चालवणे कठिण दरम्यान , जाहिरात हा कोणत्याही वृत्तवाहिनीचा प्रमुख पाया आहे . जाहीराती नसतील तर वृत्तवाहिन्या चालवणे कठीण होऊन बसेल . जाहिरातीशिवाय वृत्तवाहिनी चालवणे केवळ प्रसारभारतीसारख्या सरकारी कंपनीलाच जमू शकते . खासगी कंपन्यांचे ते काम नव्हे . त्यामुळे जाहिरातीतून टिव्ही चॅनल ( दुरचित्रवाणी वाहिन्या ) मिळणाऱ्या पैशांवर वाहिन्यांचे लक्ष असते . जाहिराती मिळविण्यासाठी आणि आपल्या कार्यक्रम किती लोकप्रिय आहे . हे पाहण्यासाठी त्याची चॅनलला मदत होते . दुसऱ्या बाजूला जाहिरातदारांचे टीआरपीच्या आकड्यांकडे बारिक लक्ष असते . कारण त्याला त्याचे उत्पादन , संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो . त्यामुळे ज्या चॅनलला टीआरपी अधिक त्या चॅनलला जाहीरात द्याण्यास जाहिरातदार अधिक उत्सुक असतो . त्यामुळे वाहिनीसाठी जाहिराती अधिक हव्या असतील तर टीआरपी अधिक असावा लागतो असा एक ढोबळ संकेत आहे .

टीआरपी कसा मोजला जातो ... ?

बार्क ( BARC ) म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउन्सील ( Broadcast Audience Research Council ) टीआरपी मोजत असते . प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 45 हजार घरांमध्ये टीआरपी डिवाइस लावण्यात आले आहे . टीआरपी मशिनला बार - ओ - मीटर किंवा पीपल मीटर असे म्हणतात . हे मीटर शो एम्बेड वॉटरमार्क्स रेकॉर्ड करते .

टीआरपी मशिन कसे काम करते ... ?

ज्या घरात टीआरपी मशीन लावलेले असते त्या मशीनला एक बटन असते . घरातील जो सदस्य वाहिनीवरील कार्यक्रम पाहतो त्या वेळी त्याने ते बटन दाबायचे . ज्यामुळे मशिनमध्ये संबंधित टीव्हीवर कोणता टीव्ही चॅनलवरचा कोणता कार्यक्रम पाहिला जात आहे याची माहिती मिळते . टीआरपीच्याज्ञ आकड्यांवरुन कळते लोक कोणत्या प्रकारचे कार्यक्रम पाहतात . किती वेळ टीव्ही पाहतात . कोणते चॅनल पाहतात .

बार्क ( BARC ) : बार्क ही एक इंडस्ट्री बॉडी आहे . ज्यात जाहितदार , जाहिरात कंपन्या , प्रसारण कंपन्या यांचा समावेश आहे . या सर्व घटकांची मालकी बार्ककडे आहे . तसेच इंडियन सोसायटी ऑफ अडवर्टाईजर्स , इंडियन ब्रॉडकॉस्टींग फाऊंडेशन आणि अॅडवर्टायजिंग एजन्सी असोशिएशन ऑफ इंडिया संयुक्त मालक आहे .

टीआरपीच्या माहितीचा बार्क कसा करते वापर ... ? :

आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बार्क आपला डेटा जाहीर करते . यात वेगवेळे विभाग करुन ही आकडेवारी जाहीर केली जाते . कोणता कार्यक्रम किती वेळ पाहिला गेला याचीही माहिती जाहीर केली जाते . स्पष्टच सांगायचे तर जवळपास 45 हजार घरांमध्ये लावलेले डिवाईस सांगतात की कोणते कार्यक्रम किती काळ पाहिले जातात . त्यावरुनच कार्यक्रमांची लोकप्रियता मोजली जाते . दरम्यान , बार्क डिवाईसची माहिती गोपनीय ठेवते . म्हणजेच ती कोणत्या घरांमध्ये लावली आहेत याबाबत माहिती उघड केली जात नाही .


Post Reply