ग्रामीण भागात अनेक शेतकरी, मजूर गळ्यात मफलर बांधतात. अनेकदा मफलर ऐवजी टॉवेलही पहायला मिळतो.
असे मफलर किंवा टॉवेल असणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे.
टोपी ( मग ती गांघी टोपी असो की खेळाडू वापरतात तसली असो) वापरून जे फायदे होत नाहीत ते ते या मफलरने साध्य होते.
मफलर टोपीसारखेही बांधता येते. टोपीसारखे फ्लॅफ पुढे करूनही बांधता येते.
अनेक वयस्कर खेळाडूंची टोपी वापरू शकत नाहीत. त्यांना मफलर, टॉवेल बांधणे सोपे अन सोईचे आहे.
मफलर (किंवा टॉवेल) यांचा अनेक तर्हेने उपयोग करता येतो. उन्हापासून, हवेपासून संरक्षण करता येते. घाम पुसता येतो. गरजेचे वेळी काही सामान बांधता येते. हात पाय इजा झाल्यास, जखम बांधता येते.
उत्तर भारतीय गळ्यात गमछा किंवा हातरूमाल बाळगतात. तसेच जळगाव कडील भागात असल्या हातरूमालाला बागाईतदार असे म्हणतात. तो शक्यतो पांढर्या रंगात असतो.
पण हातरूमालापेक्षा मफलर लांबरूंद असल्याने त्याचा अनेक तर्हेने उपयोग शक्य आहे.
थोडक्यात हवामान योग्य नसतांना ग्रामीण रहिवासी असे मफलर का बांधतात हा प्रश्न आपणाला पडल्यास त्याबद्दल योग्य विचार आपण करू शकाल.