दिनांक: १२/१०/२०२०: ग्रीड फेल झाल्यामुळे संपूर्ण मुंबई विभागातील ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील वीजप्रवाह खंडीत झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. याबाबत बेस्ट इलेक्ट्रिसिटीने ट्विटमध्ये असे म्हटले की, टाटाकडून येणार्या विद्युत पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे शहरातील कार्यालये, लोकल रेल्वे ठप्प झाली असून रुग्णालयांनाही याचा फटका बसला आहे. ग्रिड बिघाड झाल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला असल्याची पुष्टी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट [बेस्ट] च्या प्रवक्त्याने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 400 केव्हीची लाइन खराब झाली आहे. यामुले एमआयडीसी, पालघर, डहाणू भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत झाला. राज्य सरकारने या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.
ग्रीड फेल्युअरमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह अनेक वीजपुरवठा खंडीत
Forum rules
विविध प्रकारच्या बातम्यांचे मालकीहक्क त्या त्या वेबसाईटचे आहेत.
विविध प्रकारच्या बातम्यांचे मालकीहक्क त्या त्या वेबसाईटचे आहेत.
- जेठालाल गडा
- Posts: 4
- Joined: Mon Oct 19, 2020 9:41 am
Re: ग्रीड फेल्युअरमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह अनेक वीजपुरवठा खंडीत
वीज नाही म्हणजे लोक टीव्ही बघणार नाही. आमच्या दुकानाचे नुसकानच आहे बघा भाऊ.
गडा इलेक्ट्रॉनिक्स
टेंशन काय जात नाय, अन बबीता काय येत नाय!
टेंशन काय जात नाय, अन बबीता काय येत नाय!